साखर, कांदा निर्यात थांबवल्यास भारत बांगलादेशला आगावू माहिती देईल: पंतप्रधान शेख हसीना

259

ढाका : जर भारत सरकारने साखर, कांदा, आल्ले, लसूण अशा जीवनावश्यक वस्तूंची निर्यात थांबविण्याबाबत काही पावले उचलली, तर त्याची आगावू माहिती बांगलादेशला दिली जाईल, असे पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितले. त्यांनी आपल्या अलिकडेच झालेल्या भारत दौऱ्यातील काही महत्त्वपूर्ण निर्णयांबाबत गोनो भवनात प्रसारमाध्यमांना माहिती दिली. यावेळी त्या बोलत होत्या.

पंतप्रधान शेख हसीना यांनी दोन्ही देशांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराबाबत विस्तृत माहिती दिली. भारताच्या आपल्या चार दिवसांच्या राजकीय दौऱ्याबाबतचा तपशील त्यांनी सांगितला. शेख हसीना अलिकडेच तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर गेल्या होत्या. यापूर्वी २०१९ मध्ये त्या कोविड महामारीपूर्वी भारतात गेल्या होत्या. पत्रकार परिषदेवेळी पंतप्रधान हसीना यांनी कुशीयारा नदीबाबतच्या सामंजस्य कराराबाबतची माहिती दिली. या नदीतून बांगलादेशला १५३ क्युसेक पाणी साठवणुकीची परवानगी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here