नवी दिल्ली : गुंतवणुकीसाठी भारत हा जगातील सर्वांची पसंती असलेला देश आहे. जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांना येथे खूप संधी आहे. त्यामुळे त्यांनी भारतात गुंतवणूक करण्याची गर आहे असे प्रतिपादन वाणिज्य तथा उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी केले. देशाच्या एकूण निर्यातीला चालना देण्यासाठी सेवा क्षेत्राच्या निर्यातीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे असे ते म्हणाले. जागतिक आर्थिक मंचातर्फे आयोजित वार्षिक बैठकीत उद्योग तथा वाणिज्य मंत्री गोयल म्हणाले की, निर्यात वाढविण्यासाठी सरकार आणि कंपन्यांनी परस्परांना सहयोग दिला पाहिजे. भारतीय उद्योग महासंघ आणि डेलॉयच्या कार्यक्रमात ते म्हणाले की, दावोसमध्ये या वर्षी भारताची उपस्थिती महत्त्वपूर्ण राहिली.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गोयल म्हणाले की, कोविड महामारीपासून निर्माण झालेल्या आव्हानांमध्येही हॉस्पिटॅलिटी क्षेत्राने उच्चांकी २५० अब्ज डॉलर निर्यातीचे उद्दीष्ट गाठले आहे. गोयल यांनी जागतिक स्तरावरील व्यावसायिकांना सांगितले की भारतात युवकांची संख्या अधिक आहे. येथे कौशल्याची काहीच कमतरता नाही. पेट्रोलियम पदार्थ, इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या चांगल्या कामगिरीमुळे देशाची निर्यात १ ते २१ मे यांदरम्यान २१.१ टक्के वाढून २३.७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सरकारी आकडेवारीनुसार या महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात एकूण निक्यात २४ टक्के वाढून ८.०३ अब्ज डॉलरवर गेली आहे.