देशात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट, सक्रीय रुग्णसंख्या ४० हजारापेक्षा कमी

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी कोरोनाचे नवे ३६१४ नवे रुग्ण आढळले आहेत. सातत्याने कमी होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय रुग्णसंख्याही घटली आहे. ही रुग्णसंख्या ४० हजारांपेक्षा कमी झाली आहे. या महामारीमुळे आज ८९ जणांचा मृत्यूही झाला. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात ५१८५ रुग्ण बरे झाले. तर देशातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ४२९८७८७५ झाली. कोरोनामुळे आतापर्यंत ५१५८०३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ४२४३१५१३ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी दिलेल्या अपटेड माहितीनुसार उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ०.०९ टक्के इतकी आहे. तर राष्ट्रीय स्तरावर रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७१ टक्के झाला आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या १६६० ने घटली आहे. १२ मे २०२० रोजी ३६०४ रुग्ण होते. त्यानंतर एका दिवसातील ही कमी रुग्णसंख्या आहे. दरम्यान दिल्लीत कोरोनाचे नवे १७४ रुग्ण सापडले. सलग दुसऱ्या दिवशी एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. संक्रमणाचा वेग ०.४५ टक्के इतका आहे. दिल्लीत आतापर्यंत २६१४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८६० जणांवर उपचार सुरू आहेत. मुंबई आणि पुण्यात एकही कोरोना मृत्यू झालेला नाही. महाराष्ट्रात शुक्रवारी ३१८ नवे रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here