भारताने रचला इतिहास, कृषी उत्पादनांची निर्यात ५० बिलियन डॉलरवर

शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीचे परिणाम दिसू लागले आहे. गहू, तांदळासह अनेक कृषी उत्पादनांच्या निर्यातीत भारताने नवा विक्रम नोंदवला आहे. केंद्र सरकारने कृषी उत्पादनांच्या निर्यातीबाबतची आकडेवारी जारी केली आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये कृषी उत्पादनांची निर्यात ५० बिलियन डॉलरपेक्षा अधिक झाली आहे. ही आतापर्यंत कृषी उत्पादनांची सर्वाधिक निर्यात आहे. एस्पोर्टमध्ये आणखी वाढ होईल अशी अपेक्षा तज्ज्ञांना आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार २०२१-२२ मध्ये कृषी निर्यात १९.९२ टक्के वाढून ५०.२१ बिलियन झाली आहे. ही वाढ जबरदस्त आहे.

केंद्र सरकारने सांगितले की २०२०-२१ मध्ये ४१.८७ बिलियन डॉलर कृषी उत्पदनांची निर्या करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांतील ही कामगिरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी मदत करेल. तांदूळ निर्यात ९.६५ बिलियन डॉलर, गहू निर्यत २.१९ बिलियन डॉलर, साखर निर्यात ४.६ बिलियन डॉलर तर इतर धान्याची निर्यात १.०८ बिलियनची झाली आहे. गहु निर्यातीत २७२ टक्के वाढ झाली आहे. २०२०-२१ मध्ये गहू निर्यात ५६८ मिलियन डॉलर होती. ती आता वाढून २११९ मिलियन डॉलर झाली आहे. गहू निर्यात ५६८ मिलियन डॉलरवरुन वाढून २११९ मिलियन डॉलर झाली आहे. बासमती तांदळाची आवक यावर्षी घटली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here