भारताने इलेक्ट्रिक कारऐवजी इथेनॉल अथवा हायड्रोजन कारकडे वळण्याची गरज : मारुती चेयरमन भार्गव

मारुती सुझुकी लिमिटेडचे अध्यक्ष आरसी भार्गव यांच्या मते, भारतातील इलेक्ट्रिक कारचा कार्बन फूटप्रिंट हायब्रीड कार पेक्षा मोठा असेल. कारण देशातील ७५ टक्के वीज कोळशापासून तयार केली जाते असे वृत्त IANS ने दिले आहे.

त्यांनी All India Management Association (AIMA) द्वारे आयोजित ५० व्या राष्ट्रीय व्यवस्थापन परिषदेत बोलताना ही टिप्पाणी केली.

भार्गव म्हणाले की, जोपर्यंत भारताला किमान ५० टक्के वीज नूतनीकरणीय स्त्रोतांकडून मिळत नाही, तोपर्यंत इलेक्ट्रिक कार स्वच्छ असणार नाहीत. ते म्हणाले की सीएनजी कारकडे स्वीच करणे हादेखील एक चांगला पर्याय आहे, कारण सीएनजी हे पेट्रोलपेक्षा स्वच्छ इंधन आहे.

ते म्हणाले की, भारताने इलेक्ट्रिक कारऐवजी इथेनॉल, हायड्रोजन आणि इंधन सेल पर्यायांकडे वळले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here