भारताने कंगाल पाकिस्तानला डावलले, अफगाणिस्तानला इराणमार्गे पाठवला गहू

नवी दिल्ली : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान पारंपरिक संबंध आहेत. तालीबान सरकारच्या पूर्वी भारताने अफगाणिस्तानमध्ये पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. तालिबानची सत्ता आल्यानंतरही अफगाणिस्तानमधील गरीब जनतेला गहू पाठवला जात आहे. आधी पाकिस्तानच्या मार्गे गहू पाठवला जात होता. मात्र, आता कंगाल पाकिस्तानला बाजूला सारून भारताने आपला मित्र इराणच्या मार्गे अफगाणिस्तानला गहू पाठवून आपले आश्वासन पूर्ण केले आहे. अफगाणिस्तानमध्ये १.९ कोटी लोक भुकेले आहेत. अफगाणिस्तानमध्ये भुकबळीसारखी स्थिती निर्माण झाली आहे.
इंडिया टीव्हीच्या वेबसाइटवर प्रकाशित वृत्तानुसार, यावेळी पाकिस्तानला बाजूला सारून अफगाणिस्तानमधील लोकांना गहू पाठविण्यात आला आहे. निक्केई एशियाच्या रिपोर्टमध्ये याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत यूएनच्या प्रवक्त्याने सांगितले की, आगामी महिन्यात भारत मदत म्हणून अफगाणिस्तानला २० हजार मेट्रिक टन गहू पाठवणार आहे. भारत इराणच्या चाबहार बंदराच्या माध्यमातून गहू पाठविण्याच्या आपल्या आश्वासनाची पूर्तता करेल. यावेळी भारताने ईराण सीमा पार करून अफगाणिस्तानमधील हेरातमध्ये गहू पाठवला आहे. तर गेल्या वेळी पाकिस्तानमार्गे गव्हाचा पुरवठा अफगाणिस्तानला करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here