भारत : २०२०-२१ मध्ये पेट्रोलमध्ये ८.१ टक्के उच्च इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण

नवी दिल्ली : डिसेंबर २०२०- नोव्हेंबर २०२१ या आर्थिक वर्षात पेट्रोलमध्ये ८.१ टक्के उच्च इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

अन्न मंत्रालयाने याबाबत ट्वीट केले आहे. यात म्हटले आहे की, डिसेंबर २०२०-नोव्हेंबर २०२१ या इथेनॉल पुरवठा वर्षात डिस्टीलरींकडून ओएमसीला ३.०३ बिलियन लिटर इथेनॉल पुरवठा करण्यात आला आहे. हा पुरवठा विक्रमी आहे.

२०१३-१४ मध्ये केवळ १.५३ टक्के मिश्रण करण्यात आले होते. इथेनॉल पुरवठा केवळ ०.३८ बिलियन लिटर होता. गेल्या सात वर्षात हा पुरवठा वाढला आहे. सरकारने २०२१-२२ या सध्याच्या इथेनॉल पुरवठा वर्षात १० टक्क्यांचे मिश्रण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

अलिकडेच सरकारने ऊसावर आधारित इथेनॉलचा दर ६२.६५ रुपयांवरुन वाढवून ६३.४५ रुपये प्रती लिटर केला आहे. सी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलचा दर ४५.६९ रुपये प्रती लिटरवरून ४६.६६ रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. आणि बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलचा दर ५७.६१ रुपये प्रती लिटरवरुन वाढवून ५९.०८ रुपये प्रती लिटर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here