सर्वाधिक गतीने GDP वाढणारा देश बनणार भारत, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा दावा, क्रिप्टोकरन्सीवर चिंता

वॉशिंगटन : आगामी २०३० मध्ये संपणाऱ्या दशकात भारत जगात सर्वाधिक वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल असा विश्वास अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी व्यक्त केला. कोरोना महामारीपूर्वी आणि त्यानंतर करण्यात आलेल्या सुधारणांतून हे स्पष्ट होईल असे त्या म्हणाल्या. अर्थमंत्र्यांनी क्रिप्टोकरन्सीवर वाढत्या धोक्याबाबत चिंता व्यक्त करताना सांगितले की, याचा वापर मनी लाँडरिंग आणि टेरर फंडसाठी होऊ शकतो. सीतारमण यांनी वॉशिंग्टन डीसीमधील अटलांटिक काऊन्सीलच्यावतीने आयोजित चर्चेत म्हटले की, भारतातील आर्थिक सुधारणा स्पष्ट आहेत. कोरोना महामारीपूर्वी आणि नंतर भारतात अनेक संरचनात्मक सुधारणा करण्यात आल्या आणि महामारीवेळी संधीही मिळाली.

अर्थमंत्री सीतारमण यांनी आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून (आयएमएफ) आयोजित एका चर्चेत मनी लाँड्रिंग आमि टेरर फंडांबाबत सर्व देशांसाठी घातक स्थिती असल्याचे सांगत क्रिप्टोकरन्सीला नियमीत करण्यासाठी ग्लोबल फ्रेमवर्क तयार करण्याचे आवाहन केले. कोणताही देश एकटा या संकटाशी लढू शकत नाही. सर्व देशांसाठी हा मुद्दा चर्चेचा आहे. आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रात सीतारमण यांनी हा धोका दूर करण्यासाठी जागतिक रणनीती बनविण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here