अरब देशात फूड एक्स्पोर्टमध्ये भारत अव्वल, ब्राझील पिछाडीवर

47

देशातील निर्यातीच्या स्तरावर चांगली स्थिती दिसून आली आहे. भारताने अरब देशांना फूड एक्स्पोर्ट करण्यामध्ये ब्राझीलला पिछाडीवर टाकले आहे. गेल्या १५ वर्षात पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे. अरब ब्राझील चेंबर ऑफ कॉमर्सने ही माहिती दिली. कोविड १९ महामारीमुळे गेल्या वर्षी, २००० मध्ये ट्रेंड फ्लोमध्ये अडचणी निर्माण झाल्याने प्रथमच भारत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

ब्राझीलसाठी अरब देश सर्वात महत्त्वाचे व्यापारी भागिदार आहेत. मात्र, कोविड महामारीमुळे अरब देश आणि ब्राझीलमध्ये अडचणी निर्माण झाल्या. त्याचा परिणाम ग्लोबल लॉजिस्टिक सेवांवर पडला. परिणामी ब्राझीलचा फूड एक्स्पोर्ट भारतापेक्षा कमी झाला आहे. ब्राझीलने सादर केलेल्या डेटानुसार २२ लीग सदस्यांच्या ब्राझीलचा अॅग्री बिझनेसमधील वाटा ८.१५ टक्के झाला. तर भारताने या व्यापारात ८.२५ टक्के हिस्सा व्यापला आहे. भारताने या मार्केटवर कब्जा मिळवला आहे. ब्राझील अॅग्रीकल्चर एक्स्पोर्ट १.४ टक्के वाढून ८.१७ अब्ज डॉलर झाला. यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या काळात ब्राझीलचा एकूण व्यापार ६.७८ बिलियन डॉलर झाला आहे. यात ५.५ टक्के वाढ दिसून आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here