भारत २०२६ पर्यंत चीनला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकाचा इथेनॉल वापरकर्ता बनणार

65

नवी दिल्ली : भारत २०२६ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा इथेनॉल वापरकर्ता देशाच्या रुपात चीनला पिछाडीवर टाकू शकतो. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने (IEA) सांगितले की, २०१७ ते २०२१ या कालावधीत इथेनॉलची मागणी तीन पटीने वाढून गेल्या वर्षभरात ३ कोटी लिटरपर्यंत पोहोचली आहे. भारत २०२६ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांका इथेनॉल वापरकर्ता देशाच्या रुपयात चीनला मागे टाकून पुढे जाण्याच्या मार्गावर आहे. यासाठी जानेवारी २०२१ मध्ये भारताने २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट २०२५ पर्यंत खाली आणले आहे.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने सांगितले की, भारत इथेनॉल वापराचे समर्थन करीत आहे. तेल आयात कमी करण्यासह वायू प्रदूषण घटविण्यात आणि शेतकऱ्यांना, आर्थिक तसेच रोजगाराच्या संधी देण्यास ही बाब मोलाची ठरणार आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा इंधन आयातदार आणि वापरकर्ता देश आहे. एजन्सीने सांगितले की, भारत इथेनॉल मिश्रण वाढवण्यासाठी गतीने प्रयत्न करीत आहे. गॅसोलीन सोबत इथेनॉल मिश्रणाच्या दरातही वाढ झाली आहे. २०१७ मध्ये मिश्रण २ टक्के होते. मात्र, २०२१ पर्यंत ते ८ टक्क्यांपर्यंत पोहोचले. या वर्षभरात ते १० टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भारत आपल्या धोरणाच्या अंमलबजावणीस कटिबद्ध आहे. आपले २० टक्क्यांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी देशाने फीडस्टॉकसाठी प्रती लिटर इथेनॉलचा दर निश्चित केला आहे. नव्या इथेनॉल उत्पादन क्षमतेच्या प्लांटच्या स्थापनेसाठी आर्थिक सहाय्य, इथेनॉल रोडमॅप जारी केला आहे. फ्लेक्स फ्यूएल वाहने अनिवार्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून इथेनॉल उच्च मिश्रणासाठी अधिक प्रोत्साहन मिळू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here