फेब्रुवारीत भारतीय कंपन्याची परदेशी बाजारातील गुंतवणूक ३१ टक्क्यांनी घटली

नवी दिल्ली : भारतीय कंपन्यांची परदेशी बाजारातील गुंतवणूक फेब्रुवारी महिन्यात ३१ टक्क्यांनी घटून १.८५ अब्ज डॉलरवर आली आहे. रिझर्व्ह बँकेकडील आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, देशातील कंपन्यांनी आपल्या परदेशी तसेच भागिदारीतील उपक्रमांत २.६६ अब्ज डॉलर गुंतवणूक केली होती.

रिझर्व्ह बँकेकडील माहितीनुसार, भारतीय कंपन्यांनी विदेशी बाजारात एकूण गुंतवणूकीपैकी १.३६ अब्ज डॉलर कर्ज रुपात देण्यात आली आहे. तर २९.७३ कोटी डॉलर गुंतवणूक इक्विटी रुपात आहे. उर्वरित १८.३८ कोटी रुपये गॅरंटी स्वरुपात आहे. दरम्यान, भारतीय कंपन्यांनी एकूण विदेशी गुंतवणूक जानेवारीच्या १.१९ अब्ज डॉलरच्या तुलनेत अधिकच आहे.

या कंपन्यांची गुंतवणूक फेब्रुवारी महिन्यात भारतीय कंपन्यांनी विदेशी बाजारात केलेल्या मुख्य गुंतवणूकीत टाटा स्टीलने सिंगापूर येथील आपल्या पूर्ण स्वामित्वाखालील कंपनीत एक अब्ज डॉलर तसेच सन फार्मास्युटिकलने अमेरिकेतील संयुक्त उपक्रमात केलेल्या १० अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचा समावेश आहे. ओएनजीसी विदेश लिमिटेडने रशिया, म्यानमार, सुदान, कोलंबिया, व्हीएतनाम, अझरबैजान येथील आपल्या संयुक्त उपक्रमांत ९.६१ कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे.

दरम्यान अमेरिकेत बॉन्डमध्ये झालेल्या नफा वसुलीने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून ५१५६ कोटी रुपये काढून घेतले. गेल्या दोन महिन्यांपासून एफपीआयने भारतीय बाजारात निव्वळ गुंतवणूकदारांची भूमिका बजावली होती. एक ते पाच मार्च या काळात एफपीआयने शेअर बाजारातून ८८१ कोटी रुपये तर ऋण अथवा बॉन्ड बाजारातून ४२७५ कोटी रुपये काढले आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात एफपीआयनी भारतीय बाजारात २३६६३ कोटी रुपये आणि जानेवारी महिन्यात १४६४९ कोटी रुपये गुंतवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here