भारतीय कारखान्यांकडून हंगामात ७० लाख टन साखर निर्यातीची शक्यता

66

नवी दिल्ली : भारतीय साखर कारखान्यांकडून चालू हंगामात गेल्या हंगामाच्या तुलनेत १८ टक्के अधिक (एक मिलियन टन) साखर निर्यात करतील अशी शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरीव दर निर्यातीसाठी अधिक अनुकूल आहेत.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) महासंचालक अविनाश वर्मा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, या स्तरावर किती साखर निर्यात होईल याचा आपण अंदाज बांधू शकत नाही. अलिकडे तीन महिन्यांपूर्वी आपण अनुदानाशिवाय साखर निर्यात करू शकत नव्हतो. ब्राझीलमध्ये झालेले कमी उत्पादन आणि थालयंडमध्ये उत्पादनातील अपेक्षित घसरण पाहता साखरेच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे यंदा भारताला अधिक साखर निर्यातीची संधी आहे.
वर्मा म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर आकर्षक किमती असल्याने भारतीय साखर कारखाने या वर्षी निर्यात कोट्यापेक्षा किमान दहा लाख टन अधिक निर्यात करू शकतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या बंदरांची सुविधा असलेली राज्ये उत्तर प्रदेशच्या कारखान्यांपेक्षा अधिक निर्यात करू शकतात. सद्यस्थितीत ते देशांतर्गत बाजारात साखर विक्री करीत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दरवाढ ब्राझील आणि थायलंडमधील साखर उत्पादनात घट झाल्याने झाली आहे. कच्च्या तेलाचे वाढलेले दर पाहता ब्राझीलने उसाचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी केला आहे. ब्राझीलचे साखर उत्पादन यावर्षी ७० लाख टनांनी कमी असेल अशी शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याच्या किमती भारतात एक्स मिल किंमतीच्या समान आहेत. वर्मा यांनी सांगितले की साखर कारखानदारांना निर्यात करण्यास आनंदच वाटले. कारण त्यांना भारतातील एक्स मिल किमतीपेक्षा एक रुपया कमी मिळाला तरी त्यांना पुढील हंगामाच्या आधी साखर साठा कमी करण्याची संधी मिळेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here