इंडियन ऑइल करणार LanzaJet सोबत भागिदारी : स्वच्छ विमान ईंधनाचे उत्पादन करणार

बेंगळुरू : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन उत्तर भारतातील आपल्या पानीपत रिफायनरीत स्वच्छ विमान इंधनाचे उत्पादन करण्यासाठी लांजाजेट (LanzaJet) सोबत एक सामंजस्य करार करणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष एस. एम. वैद्य यांनी रॉयटर्सला ही माहिती दिली. अमेरिकास्थित लांजाजेट कृषी तथा औद्योगिक कचऱ्यापासून निर्मित इथेनॉलपासून विमानाच्या इंधनाचे उत्पादन करण्यास कंपन्यांना मदत करते. यामध्ये Microsoft, संयुक्त राज्य ऊर्जा विभाग, जपानची मित्सुई अँड कंपनी आणि कॅनडाटी सनकोर एनर्जी सहभागी आहे.

वैद्य यांच्या म्हणण्यानुसार, २०३० पर्यंत इंडियन ऑईलद्वारे उत्पादित विमान इंधनातील २ टक्के स्थायी विमान इंधन असेल. सरकारद्वारे संचलित रिफायनरी सद्यस्थितीत इथेनॉलपासून कोणत्याही विमान इंधनाचे उत्पादन करीत नाही. कचऱ्याला इथेनॉलमध्ये बदलण्यासाठी इंडियन ऑइलने आधीच लांजाजेटची मूळ कंपनी लांजाटेकसोबत भागिदारी केली आहे आणि लांजाजेटच्या भागिदारीतून इथेनॉलला क्लिनर जेट इंधनात अपग्रेड करण्यास मदत होईल. वैद्य यांनी सांगितले की, तेल रिफायनरी गॅस पाइलपाइनना हायड्रोजन पाइपलाइनमध्ये बदलण्यासाठी इटलीच्या सनप्रोगेटी स्पासोबत चर्चा करीत आहे.

अमेरिका आणि युरोपी संघाप्रमाणे भारतात आतापर्यंत टिकाऊ विमान इंधनाला (एसएएफ) नियंत्रित करण्यासाठीची धोरणे नाहीत. युरोपीय आयोग SAF जनादेश २०२५ मध्ये SAF चे किमान प्रमाण २ टक्क्यांसोबत सुरू होईल अशी अपेक्षा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जेनिफर होल्मग्रेन यांनी सांगितले की, लांजाटेकचे उद्दिष्ट २-३ वर्षात पानीपत रिफायनरीमध्ये इथेनॉलवर आधारित विमान इंधन उत्पादन सुरू करण्याचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here