लॉकडाउनमध्ये भारतीय रेल्वेने केला साखर, मीठ आणि खाद्यतेलाचा पुरवठा

कोविड -१९ च्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान, सर्वसामान्यांच्या वापरासाठी साखर, मीठ आणि खाद्यतेलाची कमतरता भासू नये यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्न करीत आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ही बाब समोर आली आहे.

या काळात भारतीय रेल्वेमार्फत या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, वाहतूक व उतराईचे काम सुरू आहे.

एका अहवालात म्हटले आहे की, लॉक डाऊनच्या गेल्या १३ दिवसात म्हणजेच २३ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत रेल्वेने १३४२ व्हेगन साखर, ९५८ वॅगन मीठ आणि ३७८ वॅगन खाद्यतेलाचा पुरवठा केला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here