भारतीय रिटेल दुकानदार देतील चीनला 40 हजार करोडचा झटका

नवी दिल्ली: भारताकडून सीमेबाबत वाद वाढल्यानंतर चीनसमोरील आव्हाने वाढत आहेत. सरकारकडून चहुबाजूंनी घेराबंदी नंतर आता रिटेल व्यावसायिकांची संघटना कैट ने सणांवेळी चीनचे उत्पादन न विकण्याचे अभियान चालवण्याची घोषणा केली आहे. कैट च्या बॅनरखाली देशातील व्यापारी वर्ग चीन ला यावर्षी दिवाळीवेळी जवळपास 40 हजार करोड रुपयांचा मोठा झटका देण्यासाठी सज्ज आहेत.

कैट चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया तसेच राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, प्रत्येक वर्षी भारतात दिवाळीच्या वेळी जवळपास 70 हजार करोड चा व्यापार होतो. यापैकी जवळपास 60 टक्के म्हणजेच 40 हजार करोड रुपयांचे सामान गेल्या वर्षांमध्ये चीनमधून आयात होत होते. कैट च्या म्हणण्यानुसार, सीमेवर तणावानंतर बदललेल्या परिस्थितीत ग्राहक चीनचे सामान न खरेदी करण्याबाबत विचार करत आहेत. अशामध्ये कैट च्या नेतृत्वाखाली रिटेल व्यावसायिक देशभरात भारतीय सामान आमचा अभिमान आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत याला जमीनी स्तरापर्यंत यशस्वी बनवण्यासाठी भारतीय उत्पादने प्रमुखपणे विकण्यासाठी स्टॉक गोळा करत आहेत.

दिवाळीला मोबाइल, इलेक्ट्रॉनिक तसेच इलेक्ट्रिकल सामान, खेळणी, होम फर्निशिंग, भेटवस्तू, घड्याळे, कपडे, फुटवेयर, कॉस्मेटिक्स, ब्यू प्रॉडक्टस, फर्नीचर, एफएमसीजी प्रॉडक्टस, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑफिस स्टेशनरी , दिवाळी पूजा आणि दिवाळी ला घर, दुकान, ऑफिस सजवण्याचे दिवाळीचे सामान आदी मोठ्या प्रमाणात विकण्याची शक्यता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here