फेब्रुवारीत भारतातील कच्च्या तेलाच्या उत्पादनात २.१९ टक्क्यांची घसरण

नवी दिल्ली : भारतातील कच्च्या तेलाच्या उत्पादनात फेब्रुवारी महिन्यात २२७२.२६ thousand metric tonnes (TMT) पर्यंत घसरले आहे. हे उत्पादन गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत २.१९ टक्के कमी आहे. तर उद्दीष्टांच्या तुलनेत ५.६ टक्क्यांनी घटले. पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल – फेब्रुवारी २०२१-२२ या दरम्यान कच्च्या तेलाचे उत्पादन २७१६२ टीएमटी होते. आपल्या उद्दीष्टांपेक्षा ते ४.७१ टक्के कमी आहे. तर गेल्या वर्षी समान कालावधीच्या तुलनेत २.५७ टक्क्यांनी कमी आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये नोंदणीकृत ब्लॉकमध्ये तेल आणि नैसर्गिक गॅस निगमकडून (ओएनजीसी) कच्च्या तेलाचे उत्पादन १५१०.५२ टीएमटी होते. या महिन्याच्या उद्दीष्टांपेक्षा ते २.९२ टक्क्यांनी कमी आहे. फेब्रुवारी २०२१ च्या उत्पादनाच्या तुलनेत ते २.२२ टक्क्यांनी घटले आहे. ऑइल इंडिया लिमिटेडकडून फेब्रुवारी २०२२ या दरम्यान नोंदणीकृत ब्लॉकमधील कच्च्या तेलाचे उत्पादन २३०.२५ टीएमटी होते. ते फेब्रुवारी २०२१ मधील उत्पादनाच्या तुलनेत ५.३८ टक्के अधिक आहे. मात्र, महिन्याच्या उद्दीष्टापेक्षा १०.९७ टक्क्यांनी कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here