भारताचे इथेनॉल धोरण आणि साखर उद्योग    

नवी दिल्ली चीनी मंडी

या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने इथेनॉल विषयी आपले सकारात्मक धोरण मांडायला सुरुवात केली. यामुळे अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला दिलासा मिळाला. सरकारच्या प्रयत्नांनाही साखर उद्योगातून चांगला प्रतिसाद मिळाला. अर्थात साखर कारखान्यांचाही इथेनॉल उत्पादनातून चांगला फायदा होणार आहे.

गेल्या मे महिन्यात केंद्र सरकारने देशाचे जैवइंधन धोरण म्हणून १० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे लक्ष्य ठेवण्याच्या सूचना दिल्या. सप्टेंबर महिन्यात सरकारने थेट उसाच्या रसापासून तयार केलेल्या इथेनॉलची खरेदी किंमत २५ टक्क्यांनी वाढविली. अतिरिक्त साखर उत्पादन रोखण्यासाठी सरकारने थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्याची अनुमती दिली. एका रेटिंग एजन्सीने दिलेल्या अहवालात साखर कारखान्यांसाठी इथेनॉलचा पर्याय अतिशय उत्तम असल्याचे म्हटले आहे.

साखर उत्पादनातील अर्थकारण

एक किलो ६०० ग्रॅम उसापासून एक लिटर इथेनॉल तयार होते. याला कनव्हर्जन रेट म्हणून ओळखले जाते.

– इथेनॉलच्या नव्या दरांनुसार आपण कनव्हर्जन रेटची विभागणी केली, तर सगळा हिशेब एक किलो साखर विक्री एवढाच होतो.

– साखरेची निर्मिती होताना तीन प्रमुख टप्पे असतात. त्यातली पहिल्या टप्प्यात बी ग्रेड मळी तयार होते. त्यात साखरेचा चांगला अंश असतो.

– या मळीपासून साखर तयार केली जाते. पुढे यातून तयार होणाऱ्या मळीला सी ग्रेड मळी म्हणतात.

– या मळीचाही पुढे साखर निर्मितीसाठी वापर केला जातो.

आता जर इथेनॉल साखर कारखान्यांसाठी चांगले पैसे मिळवून देणारा पर्याय असेल, तर हा पर्याय कसे काम करेल, याचा विचार केला पाहिजे. मुळात मार्च २०१६ आणि मार्च २०१८ यामध्ये साखर उद्योगाला अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अडचणींचा सामना करावा लागला. दुसरीकडे इथेनॉलची खरेदी आणि त्याची किंमत निश्चित असते. कारण हंगामाच्या सुरुवातीलास सरकार त्याचा खरेदी दर जाहीर करते. कारखान्याच्या डिस्टलरी क्षमतेनुसार जादा इथेनॉल उत्पादन केले, तर कारखान्याच्या नफा क्षमतेमध्ये वाढ होते. यामुळे ऊस उत्पादकांची थकबाकी भागवण्याचा प्रश्न निकालात निघणे शक्य आहे. पण, या इथेनॉल धोरणाचे परिणाम दिसायला अजूनही एक वर्षाचा अवधी लागणार आहे. कारण, काही साखर कारखान्यांनी आता आपली इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची संधी चांगली आहे. सरकारने आता १० टक्के मिश्रणाचे लक्ष्य ठेवले आहे.

इथेनॉल मिश्रणाची सध्याची राष्ट्रीय सरासरी साधारण ४.०२ टक्क्यांच्या आसपास आहे. तेल कंपन्यांनी बी ग्रेड मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलसाठी ४८.५ कोटी, तर थेट उसाच्या रसापासून तयार केलेल्या इथेनॉलसाठी १.४८ कोटी लिटर इथेनॉल खरेदीची टेंडर काढली आहेत. यामुळे साखरेचे उत्पादन ५ लाख टनाने कमी होईल, असा अंदाज आहे. दुसरीकडे ब्राझीलमध्ये अपेक्षेपेक्षा कमी साखर उत्पादन झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर २५ टक्क्यांनी वधारले आहेत.

ब्राझीलमध्ये साखर उत्पादन ९० लाख टनानी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे भारत ४० ते ४५ लाख टन साखर निर्यात करण्याची शक्यता आहे. अर्थात या परिस्थितीची गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहिली जात होती. त्यामुळे साखर उद्योगातून त्याचे स्वागत केले जात आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here