ऑक्टोबर २०२१ मध्ये भारताची निर्यात ५६.५१ अब्ज डॉलर्सवर

63

नवी दिल्ली : ऑक्टोबर २०२१ मध्ये भारताची एकूण निर्यात ५६.५१ बिलियन अमेरिकन डॉलर्स झाली असल्याची माहिती केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आली आहे. यामध्ये व्यापारी निर्यात म्हणजेच मर्चेंडाइज एक्स्पोर्ट आणि सेवा क्षेत्र या दोन्हींचा समावेश आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीत चांगली वाढ दिसून आली आहे. ऑक्टोबर २०२० च्या तुलनेत ही वाढ ३५.१६ टक्के जादा आहे. तर ऑक्टोबर २०१९च्या तुलनेत निर्यातीमध्ये २९.१३ टक्क्यांची सकारात्मक वाढ दिसून आली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. आयातीबाबतही मंत्रालयाने माहिती दिली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये एकूण आयात ६८.०९ बिलियन अमेरिकन डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर २०२० च्या तुलनेत ही ५७.३२ टक्के जादा आहे. तर ऑक्टोबर २०१९च्या तुलनेत यामध्ये ४०.८२ टक्के इतकी सकारात्मक वाढ दिसून आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here