भारताच्या निर्यातीत तेजी, नोव्हेंबर महिन्यात २६ टक्कांची वाढ

नवी दिल्ली : भारताकडून होणाऱ्या निर्यातीत तेजी आली आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेली निर्यात, गेलावर्षी समान कालावधीच्या तुलनेत २६.४९ टक्के तर २०१९च्या तुलनेत १५.९३ टक्क्यांनी अधिक आहे. नोव्हेंबर महिन्यात आयात गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत ५७.१८ टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे. परिणामी व्यापारी तूट १२८ टक्क्यांनी वाढली आहे. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत २६२.४६ अब्ज डॉलर किमतीची निर्यात करण्यात आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने या आर्थिक वर्षात ४०० अब्ज डॉलरच्या निर्यातीचे उद्दीष्ट ठेवले आहे.

बुधवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी नोव्हेंबर महिन्यात २९.८८ अब्ज डॉलर्स किमतीची निर्यात झाली. तर ५३.१५ अब्ज डॉलरची आयात झाली. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात २३.६२ अब्ज डॉलरची आयात आणि ३३.८१ अब्ज डॉलरची आयात करण्यात आली होती. इंजिनीअरिंग वस्तूंची कामगिरी चांगली झाली. गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत यंदा ३६.९८ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चांगली निर्यात दर्शविणाऱ्या जेम्स आणि ज्वेलरीच्या निर्यातीत ११.१० टक्क्यांची घट झाली आहे. फार्मा सेक्टरमधील निर्यातीतही ७.०३ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here