भारताची परकीय चलनाची गंगाजळी दोन वर्षांच्या नीचांकी स्तरावर

नवी दिल्ली : देशातील परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाली आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही आकडेवारी जाहीर केली. २१ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा ३.८४७ अब्ज डॉलरने घसरून ५२४.५२ अब्ज झाला आहे. मागील अहवाल आठवड्यात एकूण साठा ४.५० अब्ज डॉलरने घसरून ५२८.३७ बिलियन डॉलर झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून परकीय चलन साठ्यात घट होत आहे. आता तर तो गेल्या दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात जुलै २०२० पासून सर्वात मोठी घट नोंदवली गेली आहे. परकीय चलनाच्या साठ्यात एका वर्षात ११६ अब्ज डॉलरची घट झाली आहे. एक वर्षापूर्वी, ऑक्टोबर २०२१ मध्ये देशाचा परकीय चलन साठा ६४५ अब्ज डॉलरचा उच्चांक गाठला होता. देशाच्या चलन साठ्यात घसरण होण्याचे मुख्य कारण रुपयाची घसरण रोखण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. केंद्रीय बँकेला सध्या चलन साठ्यातून मदत मिळत आहे. शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात सुवर्ण मूल्य भांडार ३७,२०६ अब्ज डॉलरवर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here