उत्पादन क्षेत्रात भारताची घोडदौड जारी : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान फोनची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मोबाइल फोनच्या निर्यातीने 7 महिन्यांत 5 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत भारताने नोंदवलेल्या 2.2 अब्ज डॉलर्स निर्यात मूल्याच्या तुलनेत हे दुप्पट आहे.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटवर पंतप्रधानांनी उत्तर दिले:

“उत्पादन क्षेत्रात भारताची घोडदौड सुरूच आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here