कोरोनाविरोधातील लढाईत भारताचा विक्रम, १०० कोटी लसीकरणाचे गाठले उद्दीष्ट

नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरोधातील लढाईत भारताने लसीकरण अभियानात ऐतिहासिक लक्ष्य गाठले आहे. भारताने आज सकाळी ९.४८ वाजता १०० कोटी लसीकरणाचा आकडा पार करुन जगासमोर उदाहरण ठेवले आहे. भारतातील ७५ टक्के ज्येष्ठांना किमान एक डोस मिळाला आहे. तर ३१ टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारकडून आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांना १०२ कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी बुधवारी लसीकरणास पात्र लोकांनी त्वरीत लस घ्यावी आणि भारताच्या ऐतिहासिक लसीकरण मोहीमेत योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.

१०० कोटी लसीकरणानंतर देशभरात उत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गत देशभरात कार्यक्रम आयोजित करुन लसीकरणासाठी योगदान देणाऱ्यांचे आभार मानले जात आहेत. तदिल्लीतील आरएमएत हॉस्पिटलमध्ये एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लोकांचे आभार मानले. ते उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील कैलास मानसरोवर भवनातील कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

आरोग्यमंत्री मनसुख मांडविय हे लाल किल्ल्यावरून गायक कैलाश खेर यांचे गाणे आणि ऑडिओ व्हिज्युअल फिल्म रिलीज करतील. याशिवाय लाल किल्ल्यावर सर्वात मोठा खादीचा तिरंगा फडकवला जाईल. विमानतळ, मेट्रो, रेल्वे स्टेशनवर लसीकरणाची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान स्पाइसजेटने १०० कोटी लसीकरणाचा आनंदोत्सव साजरा करताना दिल्ली विमानतळावर खास ड्रेसचे प्रदर्शन केले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here