जून 2023 मध्ये भारताची एकंदर निर्यात( उत्पादने आणि सेवा एकत्रितपणे) 60.09 अब्ज डॉलर मूल्याची होण्याचा अंदाज आहे. जून 2022 च्या तुलनेत ही वृद्धी उणे असून ती उणे (-) 13.16 टक्के आहे. जून 2023 मध्ये एकंदर आयात 68.98 अब्ज डॉलर मूल्याची होण्याचा अंदाज असून जून 2022 च्या तुलनेत ही वृद्धी उणे असून ती उणे (-) 13.91 टक्के आहे.
एप्रिल ते जून 2023 मध्ये भारताची एकंदर निर्यात( उत्पादने आणि सेवा एकत्रितपणे) एप्रिल ते जून 2022 च्या तुलनेत घट होऊन उणे (-) 7.29 टक्के असेल. एप्रिल ते जून 2023 मध्ये भारताची एकंदर आयात ( उत्पादने आणि सेवा एकत्रितपणे) एप्रिल ते जून 2022 च्या तुलनेत घसरण नोंदवत उणे (-) 10.18 टक्के असेल.
(Source: PIB)