साखरेची एमएसपी ३१०० रुपये प्रति क्विंटल होण्याचे संकेत

2089

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

कोल्हापूर : चीनी मंडी

साखरेचा देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) ३१०० रुपये प्रति क्विंटल करण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात किमान विक्री दर ३१०० रुपये जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अतिरिक्त उत्पादन आणि साखरेची घसरलेली किंमत यांमुळे गेल्या वर्षी केंद्र सरकारने साखरेचा देशांतर्गत बाजारातील किमान विक्री दर २९०० रुपये केला होता. पण, सध्या त्या दराने साखर विक्री केल्यास कारखान्यांना उत्पादन खर्चाचा मेळही घालता येत नाही. त्यामुळे साखर कारखानदारांकडून सातत्याने किमान विक्री दर वाढवण्याची मागणी होत आहे. साखरेचा उत्पादन खर्च सध्या ३४०० रुपये प्रति क्विंटल आहे. कारखाने अडचणीत आहेत. गेल्या हंगामातील जवळपास १०० लाख टन साखर शिल्लक असताना यंदांच्या हंगामात आणखी ३०७ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे साखरेच्या साठ्याचे ओझे दिवसेंदिवस वाढतच आहे. साखर बँकांकडे तारण असल्यामुळे निर्यात खोळंबली आहे. तर, देशांतर्गत बाजारात साखरेला उठाव नाही. त्यामुळेच कारखान्यांनी ऊस बिल देणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. पण, किमान विक्री किंमत वाढल्यास कारखान्यांना बँकांकडून अडव्हान्समध्ये वाढ होईल आणि शेतकऱ्यांची एफआरपी देणे शक्य होईल.

सध्या देशांतर्गत बाजारातील दरांपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा दर कमी आहे. त्यामुळे निर्यात केल्यास सध्या २०० रुपये होणारा तोटा ४०० रुपये होईल. त्यामुळे निर्यातीमध्ये आणखी अडथळे निर्माण होतील, अशी भीती आहे. सध्या साखरेचा साठा इतका वाढला आहे की, ती निर्यात केल्याशिवाय साखरेचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळेच किमान विक्री किंमत जास्त वाढवण्याचे धाडस सरकार करत नसल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे किरकोळ बाजारातील साखरेची किंमत वाढण्याची शक्यता असून, ग्राहकांच्या खिशाला चाट लागणार आहे.

दरम्यान, साखर उद्योगाला कायमस्वरूपी अडचणीतून बाहेर काढण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात येत असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here