भारत-अमेरिकेदरम्यान परस्पर विश्वासाची भागिदारी, मोदी-बायडेन यांदरम्यान द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली: क्वाड समिटनंतर (QUAD Summit) भारत-अमेरिका या दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय बैठकीत चर्चा झाली. यावेळी अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. बायडेन यांच्याशी चर्चेमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत-अमेरिकेदरम्यान परस्पर विश्वासाची भागिदारी झाली आहे. सुरक्षेसह अनेक क्षेत्रामध्ये हित महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन म्हणाले की आम्ही लसीकरण उत्पादन आणि स्वच्छ ऊर्जेच्या मुद्यावर पाठबळ देण्याचा करार केला आहे याबाबत मला आनंद वाटतो.

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेने यांनी द्विपक्षीय संबंधांबाबत मंगळवारी विस्तृत चर्चा केली. परस्पर सहयोग, मैत्री टिकविण्याच्या विचारांबाबत आदान-प्रदान करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेवेळी सांगितले की, असे अनेक विषय आहेत की ज्यावर आम्ही एकत्र काम करू शकतो. भारत-अमेरिकेत सुरक्षेसह इतर विषयांत आम्ही मजबुतीने काम करू शकतो. लोकांमधील संबंध आणि मजबूत आर्थिक भागिदारी आम्हाला प्रगतीपथावर नेईल. दोन्ही देशांमधील व्यवसाय आणि गुंतवणूक यांचा सातत्याने विस्तार होत आहे. मात्र, आताही क्षमतेपेक्षा कमी गुंतवणूक झाली आहे. मला विश्वास वाटतो की, भारत-अमेरिका गुंतवणूक प्रोत्साहन करारामुळे गुंतवणुकीच्या दिशेने ठोस प्रगती पाहायला मिळू शकेल. दोन्ही देश परस्परातील समन्वय चांगला ठेवून काम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here