आगामी पाच वर्षात साखर उत्पादनात आत्मनिर्भरतेचे इंडोनेशियाचे उद्दिष्ट

जकार्ता : इंडोनेशियाकडून पुढील पाच वर्षात आत्मनिर्भर बनण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्या साखर क्षेत्राचा विकास केला जाईल आणि नंतर साखरेवर आधारित इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी सांगितले.

देशाच्या मालकीची फर्म पीटीपीएन एक्सद्वारे नियंत्रित इथेनॉल उत्पादन एनर्जी अॅग्रो नुसंताराच्या मालकीच्या ऊस बागायतीची पाहणी केल्यानंतर राष्ट्रपती विडोडो यांनी सांगितले की, इंडोनेशियातील ऊस शेतीचे क्षेत्र ७,००,००० हेक्टर म्हणजेच १.७३ मिलियन एकरपर्यंत विस्तारीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले, जर आपण खरोखरच ७ लाख हेक्टरमध्ये ऊस पिक लागवड करू शकलो तर पुढील पाच वर्षात साखर उत्पादनात आत्मनिर्भर बनू शकतो. इंडोनेशियात सद्यस्थितीत १,८०,००० हेक्टरमध्ये ऊस शेती केली जाते. इंडोनेशिया जगातील कच्च्या साखरेच्या सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक आहे. जोकोवी यांनी इंधनासोबत ५ टक्के इथेनॉल मिश्रणाचा उल्लेख करताना सांगितले की, जेव्हा हा टप्पा आपण गाठू, त्यानंतर E१० अथवा E२० पर्यंत त्याचा विस्तार केला जावू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here