इंडोनेशियामध्ये 1,30,000 टन साखर आयात करण्याची शिफारस, भारताला मिळू शकेल प्राधान्य

इंडोनेशियामध्ये लवकरच साखर आयात केली जावू शकते. इंडोनेशिया च्या कृषी मंत्रालयाने मे पर्यंत 1,30,000 टन पांढर्‍या साखरेच्या आयातीची शिफारस केली आहे, कारण देशामध्ये ऊस गाळप उशिरा सुरु होण्याचा अंदाज आहे.
कृषी मंत्रालयाचे उच्च अधिकारी अंगुग हेन्द्रियादी यांनी सांगितले की, पीक तोडणी आणि साखर उत्पादन, जे साधारणपणे मे मध्ये सुरु होते, यावर्षी जून च्या शेवटपर्यंत सुरु होण्याची संभावना आहे. यामुळे इंडोनेशिया साखर खरेदीसाठी भारताला प्राधान्य देवू शकतो. आयातीच्या अंतिम निर्णयाची घोषणा आर्थिक प्रकरणाचे समन्वयक मंत्रालयाकडून दिली जाईल.

भारताच्या साखर कारखान्यांसाठी निर्यात ही एक सुवर्ण संधी आहे. इंडोनेशिया मध्ये या हंगामात साखरेची कमी आहे. स्टेट लॉिजिस्टिक एजंसी ने यावर्षी एप्रिलच्या शेवटी सुरु होणार्‍या रमजान च्या महिन्यात साखरेच्या किमती नियंत्रीत करण्यासाठी 200,000 टन साखर आयातीच्या मंजूरीची मागणी केली आहे. इंडोनेशियामध्ये निर्यात ही भारतीय साखर कारखान्यांसाठी नव्या संधी मिळवून देवू शकेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here