इंडोनेशिया करणार साखर आयातीमध्ये कपात

290

जकार्ता : इंडोनेशियाने साखर उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. स्टेट प्लांटेशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद अब्दुल गनी यांनी सांगितले की, सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या साखर कारखान्यांसाठी एक होल्डिंग कंपनी स्थापन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत २०२४ पर्यंत साखर आयातीत कपात आणि पांढऱ्या साखरेचे उत्पादन वाढवून १८ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची उद्दिष्ट निश्चित केले आहे.

मोहम्मद अब्दुल गनी यांनी संसद सदस्यांना सांगितले की, स्टेट प्लांटेशन समूह पीटी पेर्केबुनन नुसंतारा ३ या अंतर्गत साखर कारखान्यांकडून यावर्षी ८,००,००० लाख टन पांढरी साखर उत्पादन होईल असा अंदाज वर्तवला आहे. आणि २०३० पर्यंत उत्पादन २.६ मिलियन टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

ते म्हणाले, साखर उत्पादन वाढवून आम्ही आयात कमी करू शकतो. आपल्या परकीय चलनाची बचत करू शकतो. खाद्यपदार्थांच्या आत्मनिर्भरतेचा टप्पा गाठू शकतो. सद्यस्थितीत पीटीपीएन ३ आपली संपत्ती नव्या कंपनीस हस्तांतरित करीत आहे. नव्या कारखान्यांच्या विस्तारासाठी जवळपास २० ट्रिलियन रुपये (१.४० बिलियन अमेरिकेन डॉलर) गुंतवणूक करेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here