इंडोनेशिया उभारणार १o नवे साखर कारखाने

ब्लिटर, ई जावा (अंतरा) : इंडोनेशिया १० नवे साखर कारखाने उभारल्यानंतर साखर उत्पादनात आत्मनिर्भर होईल, असे कृषी मंत्री एंडी अमरान सुलेमान यांनी सांगितले. आमच्या देशात १० साखर कारखाने उभारण्याचे काम सुरु आहे. सध्या देशात २ .५ मिलियन टन पांढऱ्या साखर उत्पादनाबरोबरच ३००-५०० हजार टन साखर आयात होते. देशाचे आणखी १ मिलीयन टन अधिक साखर उत्पादनाचे देशाचे उद्दीष्ट आहे. जर हे उद्दीष्ट सफल झाले तर आंम्ही लवकरच पांढऱ्या साखरेच्या उत्पादनात आत्मनिर्भर होऊ शकतो. ते म्हणाले की, साखरेची औद्योगिक मागणी पूर्ण करण्यासाठी पुढच्या पाच वर्षात नव्या साखर कारखान्यांच्या निर्माणात कृषी मंत्रालय निरंतर प्रयत्न करेल. रिफाइंड साखरेची मागणी पूर्ण करण्यासाठी, आंम्हाला पाच वर्षात १० ते १५ नवे साखर कारखाने उभे करावे लागतील.

देशाच्या साखर उद्योग विकासात अनेक बाधा आहेत. काहींनी ऊस लागवड आणि नव्या साखर कारखान्यांच्या उत्पादन क्षमतेवर अनिश्चितता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अनेक अडचणी असल्या तरी आपल्याला आशावादी राहणे आवश्यक आहे. उदाहरण देताना ते म्हणाले, बॉम्बाना कारखाना उभारण्यासाठी जमीन योग्य नसल्याचे कुणीतरी सांगितले आहे, पण इथे १४० टन साखरेचे उत्पादन होऊ शकते, हे त्यांनी स्पष्ट केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here