बिहार: इथेनॉल धोरणाला उद्योगांचा प्रतिसाद

107

पटना: बिहार सरकारने लागू केलेल्या इथेनॉल उत्पादन धोरणाचा परिणाम दिसू लागला आहे. उद्योगांना या क्षेत्रात संधी दिसत असून इथेनॉल उत्पादन प्लांट सुरू करणाऱ्यांसाठी राजधानी पटनामध्ये बैठक झाली. हॉटेल चाणक्यमध्ये झालेल्या बैठकीस बिहारसह इतर ठिकाणच्या उद्योजकांचीही उपस्थिती होती. भाजपचे आमदार सच्चिदानंद रॉय यांनीही बैठकीत सहभाग घेतला.

बैठकीनंतर आमदार रॉय म्हणाले, बिहारमध्ये तीस हजार कोटींची गुंतवणूक येत आहे. शंभरहून अधिक उद्योजकांनी इथेनॉल उत्पादनात रुची दर्शवली आहे. मी स्वतः इथेनॉल युनिट सुरू करणार आहे. लवकरच हे युनिट सुरू होईल. रॉय यांनी सांगितले की मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांच्या अनुभवामुळे बिहारमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी लोक येत आहेत.

दरम्यान, पुण्यातील उद्योजकांनीही बिहारमध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधल्या आहेत. शंभरहून अधिक इथेनॉल युनिटबाबत अर्ज आल्यानंतर रि ग्रीन एक्सेल इंडियाचे चेअरमन संजय देसाई यांनी सांगितले की, बिहारमध्ये इथेनॉल उद्योगासाठी अधिक संधी आहे. मी असा प्लांट सुरू करण्यासाठी मदत करतो. देशातील विविध भागात माझ्या पाठबळाने उद्योग सुरू झाले आहेत. उत्पादनाचा परवाना मिळाल्यानंतर एक वर्षात कंपनीतून उत्पादन सुरू होईल.

दरम्यान, बिहारमधीलच एक्सेल इंजिनीअरिंग अँड कन्स्ट्रक्शनचे संचालक आशुतोष सिंह यांनी सांगितले की, बिहारमध्ये इथेनॉल उत्पादनासाठी कच्च्या मालाची कमतरता नाही. आगामी काळात इथेनॉलची मागणी वाढेल. सरकार यासाठी सवलत देत आहे. त्यामुळे बिहार इथेनॉल उत्पादनाचे केंद्र बनू शकते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here