महागाईचा भडका; गॅस सिलिंडर दरात १०० रुपयांची वाढ

92

नवी दिल्ली : वर्षांच्या अखेरच्या महिन्यात, डिसेंबरच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्य माणसाला महागाईचा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १ डिसेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपये दरवाढ केली आहे.

दरम्यान विना अनुदानित सिलिंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी केलेल्या दरवाढीनंतर दिल्लीत १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत १००.५० रुपयांनी वाढून २१०१ रुपये झाली आहे. मात्र घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या सिलिंडरचा दर स्थिर आहे. दिल्ली आणि मुंबईत १४.२ किलोचा विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर ८९९.५० रुपयांना आहे. कोलकाता येथे हा दर ९२६ रुपये तर चेन्नई येथे ९१५.५० रुपये आहे.

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या आढावा घेऊन एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. आपणही आपल्या शहरातील दर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवरून जाणून घेऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here