महागाईचा भडका; पेट्रोल दरात पुन्हा ३५ पैशाची वाढ

नवी दिल्ली : देशात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल दरात वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल ३५ पैशांनी महागले आहे.

दिल्लीत आता पेट्रोल ९९.१६ रुपये झाले आहे. मात्र आज डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. दिल्लीत अद्याप डिझेल ८९.१८ रुपये दराने मिळत आहे.

आरटीआय मधून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने कोरोना काळापासून पेट्रोलियम पदार्थांवर ५६ टक्के एक्साईज आणि कस्टम ड्युटी वाढवली आहे. सरकारने अप्रत्यक्ष करातून २.८८ लाख कोटी रुपये मिळवले आहेत. २०२०-२१ मध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीतून ३७ हजार ८०६ कोटी रुपये कस्टम ड्युटी वसूल करण्यात आली. तर ४.१३ लाख कोटी रुपयांची सेंट्रल एक्साईज ड्युटी मिळाली. पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीतून सीमा शुल्क आकारुन सरकारने ४६ हजार कोटी रुपये मिळवले आहेत

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here