सर्वसामान्यांना महागाईच्या झळा, आज पुन्हा पेट्रोल, डिझेलची दरवाढ

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीपासून आजही नागरिकांची सुटका झालेली नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी इंधन दरात पुन्हा वाढ केली. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ३० पैसै डिझेल ३५ पैशांनी महागले.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयओसीएल) वेबसाईटवर अपलोड केलेल्या माहितीनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर १०.३८४ रुपये आणि डिझेलचा दर ९२.४७ रुपये प्रती लिटर झाले. मुंबईत पेट्रोल १०९.८३ रुपये आणि डिझेल १००.२९ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोल १०१.२७ रुपये आणि डिझेल ९७.९३ रुपये प्रती लिटर दर झाला आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०४.५२ रुपये आणि डिझेल ९५.२८ रुपये दराने विक्री केले जात आहे. गेल्या अकरा दिवसांमध्ये पेट्रोलमध्ये २.३५ रुपये तर डिझेलमध्ये ३.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीच्या आधारावर आणि परकीय चलनावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल केले जातात. पेट्रोलियम कंपन्या दरांचा आढावा घेऊन पेट्रोल-डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या इंधन कंपन्यांकडून दररोज सकाळी विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातात.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना (आयओसीएल) RSP हा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. त्याची माहिती तुम्हाला आयओसीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here