महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलिंडरमध्ये २५ रुपयांची वाढ

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. विना अनुदानीत घरगुती सिलिंडरच्या दरात २५ रुपये, तर १९ किलो व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात ७५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या सिलिंडरचा दर ८८४.५ रुपये झाला आहे. तर १९ किलोच्या व्यावसायिक किलिंडरचा दर १६९३ रुपये झाला आहे.

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या आणि पंधरा तारखेला दराचा आढावा घेतात. यापूर्वी एक जुलै रोजी तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या दरात २५ रुपयांची वाढ केली होती. मात्र, नंतर पंधरा दिवसांतच विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली. आता १४.२ किलोच्या विनाअनुदानीत गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली. यापूर्वी या सिलिंडरची किंमत ८५९.५ रुपये होती.

दरम्यान, पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. सरकारने हे दर आंतरराष्ट्रीय किंमतीवर आधारित असल्याचा दावा केला आहे. दरवाढीबाबत आपल्या हातात काही नाही असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सरकारकडून गॅसच्या दरात वाढ करून अनुदान बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जर आपल्याला नव्याने एलपीजी कनेक्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही वितरकाकडे अथवा कार्यालयात जाण्याची गरज नाही. जर तुम्ही एलपीजी अर्थात घरगुती गॅस कनेक्शन घेऊ इच्छित असाल तर फक्त एक मिस्ड कॉल करण्याची गरज आहे. ही सुविधा सध्या फक्त इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (आयओसी) सुरू केली आहे. यासाठी तुम्हाला फक्त ८४५४९५५५५५ या क्रमांकावर मिस्ड कॉल करावा लागेल. जर तुम्हाला गॅस सिलिंडर भरायचा असेल तर त्यासाठी हा नंबर उपयुक्त ठरेल. तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावरून ८४५४९५५५५५ या क्रमांकावर यासाठी मिस्ड कॉल करावा लागतो.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here