अमेरिकेला महागाईचा तडाखा, १९८२ नंतर महागाईचा दर ६.८ टक्क्यांवर

54

अमेरिकेत महागाईच्या दराने उच्चांक गाठला असून ६.८ टक्क्यांपर्यंत इन्फ्लेक्शन दरामुळे किमती वाढल्या आहेत. अमेरिकेतील श्रम विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीमुळे खाद्यपदार्थ, ऊर्जा, घरे तसेच इतर वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. नोव्हेंबर २०२०च्या तुलनेत वस्तूंच्या किमती ६.८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर ऑक्टोबर २०२१ च्या तुलनेत ही वाढ ०.८ टक्के आहे.

अमेरिकेत महागाईच्या वार्षिक वाढीचा दर १९८२ नंतर उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. त्यामुळे ग्राहक आणि निम्न मध्यमवर्गीयांना दररोजच्या वस्तू चढ्या किंमतीने घ्याव्या लागत आहे. कामगारांची टंचाई असल्याने कंपन्यांनी वेतन तसेच भत्ते वाढवले आहेत. मात्र, त्यामुळे उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे महागाईत भर पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here