होळीवर महागाईचा वार, आटा, तांदळाच्या दरात २० टक्क्यांची वाढ

सर्वसामान्य जनतेला यंदाच्या होळी सणादरम्यान, महागाईचा वार सोसावा लागणार आहे. गेल्या दोन महिन्यात आटा आणि तांदळाच्या दरात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मसाल्यांच्या किमतीही २० रुपये प्रती किलो वाढल्या आहेत. रंग, गुलाल, पिचकारीचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. जी पिचकारी गेल्या वर्षी होळीवेळी ५० रुपयांना मिळत होती, ती आता ६५ रुपयांना मिळत आहे. ५० रुपयांना मिळणारे रंगांचे पाकिट आता ६० रुपयांवर गेले आहे. हर्बल आणि ऑरगॅनिक गुलालच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑरगॅनिक गुलाल ४५ रुपयांना मिळत होता, त्यात दहा रुपयांची दरवाढ झाली आहे. खाद्य पदार्थांच्या दरवाढीने यंदा होळीचे बजेटही वाढणार आहे.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, तेल व रिफाइंड तेलाच्या दरात काहीशी घट झाली आहे. मात्र, मैदा, सोजी, तूप, किसमिस आदीचे दर वाढले आहे. रिफाईंड तेल दोन महिन्यांपूर्वी १९० रुपये लिटर होते. ते आता १६५ रुपयांवर आले आहे. मोहरीच्या दरात २० रुपयांची घट झाली आहे. हे तेल आता १७० रुपयांवरून १५० रुपयांवर आले आहे. उडीद आणि मुगाचे दर ११० रुपये किलो आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे दर स्थिर आहेत. होळीच्या साहित्याच्या खरेदीला अद्याप नागरिक बाजारात आले नसल्याचे स्थानिक दुकानदारांचे म्हणणे आहे. आटा आणि तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गव्हाचा आटा दोन महिन्यांपूर्वी ३४ रुपयांनी विक्री केला जात होता. तो आता ४४ रुपयांना मिळत आहे. तर जे तांदूळ गेल्या महिन्यात ४६ रुपयांना मिळत होते, ते आता ५८ रुपयांना मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here