विठ्ठल साखर कारखान्याच्या अडचणीत वाढ

पंढरपूर : येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे कारखाना यंदा बंद ठेवण्याची वेळ संचालक मंडळावर आली आहे. कारखाना बंद असतानाच कामगारांचे गेल्या वर्षभरापासून वेतन थकले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची कोटयावधी रुपयांची एफआरपीची रक्कम कारखान्याने अद्याप दिली नाही. थकीत वेतन आणि एफआरपी मिळावी यासाठी कामगार आणि शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी कारखान्याविरोधात एल्गार पुकारला आहे. अशातच आता कारखान्याने अलीकडेच विक्री केलेल्या भंगार (स्क्रॅप ) प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) विशेष लेखापरीक्षकांना दिले आहेत. भंगार विक्री प्रकरणाची चौकशी सुरु झाल्याने संचालक मंडळाचा पाय आणखी खोलात गेला आहे.

याबाबत बोलताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत भालके म्हणाले, या प्रकरणाची माहिती नाही. जर आदेश दिले असतील तर अधिकारी नियमाप्रमाणे चौकशी करतील. विनाकारण काही लोक तक्रारी करत आहेत. त्यांना जास्त महत्व देण्याची गरज वाटत नाही. तक्रारी अर्जानुसार साखर सहसंचालकांनी सोलापूर येथील विशेष लेखा परीक्षकांना (सहकारी संस्था) या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन तसा वस्तुस्थिती दर्शक व कारवाई सूचक अहवाल साखर सहसंचालकांकडे पाठवावा, असेही लेखी पत्रात साखर सहसंचालकांनी नमूद केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here