हरियाणात ऊस पिकावर किडींचा प्रादुर्भाव

चंडीगड : ऊस पिकावर किडींचा हल्ला झाल्याने हरियाणातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस पिकाचे मुख्य जिल्हा युमाननगर, करनाल आणि कुरुक्षेत्र या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी किटकनाशकांवर खूप खर्च करीत आहेत. टॉप बोअरर आणि पोक्का बोईंग या दोन किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. त्यामुळे राज्यात सुमारे ४० टक्के क्षेत्रात असलेली को ०२३८ या प्रजातीच्या उसाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, को ११८ आणि कोएच १६० या प्रजातींवर फारसा परिणाम झालेला नाही.

हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या वाढीवर मोठे नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी प्रती एकर १०० ते २०० क्विंटल प्रती एकर नुकसान झाले होते. ऊस पिकासाठी टॉप बोअरर हानीकारक आहे. फेब्रुवारी ते ऑक्टोबर या काळात याचा प्रभाव असतो आणि ऊस पिकाचे नुकसान अधिक होते.

प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, ऊस तज्ज्ञ आणि हरियाणा शेतकरी आयोगाचे सदस्य सचिव डॉ. मेहर चंद यांनी सांगितले की, उसाच्या पिकावर टॉप बोअररचा अधिक हल्ला झाला आहे. शेतकऱ्यांना पिकाचे रक्षण करणे अवघड बनले आहे. या काळात ऊस सहा फुटंपेक्षा अधिक वाढलेला आहे. किडीच्या नियंत्रणासाठी आम्ही कार्बोफ्यूरानच्या फवारणीचा सल्ला देतो. मात्र, सद्यस्थितीत तशी उपाययोजना करणे अवघड आहे. शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासाठी मे आणि जून महिन्यातच किटकनाशकांचा वापर करावा. त्यानंतर किडींचे नियंत्रण करणे ही अवघड बाब असते असे ते म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here