साखर कारखान्याच्या दुरुस्ती कामाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

आंबेडकरनगर : जिल्हा ऊस अधिकारी हरी कृष्ण गुप्ता आणि ऊस विकास समितीचे सचिव अजय कुमार सिंह यांनी अकबरपूर साखर कारखान्याच्या दुरुस्तीच्या कामाची अचानक पाहणी केली. साखर कारखान्यातील केन कॅरीयरपासून ड्रायर हाऊसपर्यंतच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी केली.

यावेळी केन कॅरीयरचे ९० टक्के, कारखाना हाऊसचे ७५ टक्के, बॉयलरचे ७५ टक्के आणि बॉयलिंग हाऊसचे ६० टक्के आणि पॉवर हाऊसचे ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे आढळून आले. साखर कारखान्याच्या यांत्रिकी विभागाचे महा व्यवस्थापक अरुण कुमार सिंह यांनी सांगितले की, १५ ऑक्टोबरपर्यंत दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण केली जातील. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सर्व चाचण्या घेण्यात येणार आहेत ‌ त्यानंतर बॉयलर पूजन केले जाईल. त्यानंतर गळीत हंगामाला सुरुवात केली जाणार आहे.

यावेळी अप्पर महाव्यवस्थापक (ऊस) रविंद्र सिंह, सहायक महव्यवस्थापक अरविंद सिंह आदींसह अधिकारी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here