उधम सिंह नगर जिल्ह्यातील तिन्ही कारखाने वेळेवर सुरू करण्याचे निर्देश

बाजपूर : जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रातील तिन्ही साखर कारखाने वेळेवर सुरू केले जावेत असे निर्देश ऊस विभागाच्या सचिवांनी दिले आहेत. कारखान्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी सर्व कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना संबंधीत कामांना गती देण्याचे निर्देश दिले. रविवारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात आयोजित बैठकीत ऊस विभागाचे सचिव विजय यादव यांनी कारखान्याच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी कामाला गती देण्याची सूचना त्यांनी केली. मागणीनुसार कामकाज केले जावे. त्यातून हंगामावेळी अडथळा येणार नाही याची खरबदारी घ्यावी असे त्यांनी सांगितले.

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जर अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे काही अडचणी उद्भवल्या तर संबंधीत अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. नादेही साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक विवेक प्रकाश, बाजपूर साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक विनित जोशी, किच्छा कारखान्याचे मुख्य रसायनतज्ज्ञ एस. के. सिंह, मुख्य ऊस अधिकारी डॉ. राजीव अरोरा यांसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भाजप नेते राजेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ऊस विभागाच्या सचिवांना विविध मागण्यांबाबत निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here