सहारनपूर : उत्तर प्रदेश सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे लवकर मिळावेत यासाठी साखर कारखान्यांवर सातत्याने दबाव वाढवत आहे. आणि साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनांना ऊस बिलांची थकबाकी देण्यामध्ये गती आणण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
यासंदर्भात युनिवार्तामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विभागाचे उपायुक्त डॉ. दिनेश्वर मिश्र यांनी सांगितले की, सहारनपूर विभागातील दहा साखर कारखान्यांवर १,२८६ कोटी रुपयांची थकबाकी अद्याप आहे. विभागात एकूण १७ साखर कारखाने आहेत. यापैकी देवबंदसह सात कारखान्यांनी १०० टक्के ऊस बिले दिली आहेत.