साखर कारखान्यांना ऊस बिले गतीने देण्याचे निर्देश

शाहजहांपूर : ऊस विकास विभाग आणि साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये वेळेवर सुरुवात व्हावी यासाठी कारखान्यांच्या वार्षिक देखभाल, दुरुस्तीच्या कामाला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी इंद्र विक्रम सिंह यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी कारखान्यांचे पॉवर हाऊस, बॉयलर हाऊस आदींशी संबंधीत सर्व तांत्रिक कामे वेळेवर पूर्ण करावीत असे सांगितले. तसेच २५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू कसे करता येतील याचे नियोजन करण्यास सांगितले.

ऊस थकबाकीबाबत आढावा घेताना गेल्या गळीत हंगामात बजाज ग्रुपच्या मकसूदपूर कारखान्याने आतापर्यंत १.०२ अब्ज रुपये थकबाकी असल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की नवा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी उसाची थकबाकी आणि विकास अंशदानाची पूर्तता केली पाहिजे. ऊसाचे पैसे देण्यासाठी बँकांना सीसीएलसाठी अर्ज करावा. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एका आठवड्यात ही प्रक्रिया करावी. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. खुशीराम भार्गव यांनी सांगितले की जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे मिल हाऊस, बॉयलिंग हाऊस, बॉयलर आणि पॉवर हाऊसमधील देखभाल, दुरुस्तीचे काम पन्नास टक्के पूर्ण झाले आहे.

रोजा साखर कारखान्याचे कार्यकारी उपाध्यक्ष बृजेश शर्मा यांनी सांगितले की, गाळप हंगाम ३० ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन साखर कारखान्याचे आहे. सर्व साखर कारखान्यांची कामे २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावीत असे त्यांना सांगितले. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार १.४६ लाख शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले आहेत. जिल्ह्यात ९४ टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. मात्र मकसूदरपूर कारखान्याकडे जवळपास १०० कोटींची थकबाकी असल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here