ऊस थकबाकीबाबत हालगर्जीपणा करणार्‍या कारखान्यांविरोधात सक्तीच्या कारवाईचे आदेश

लखनऊ: प्रदेश मंत्री, साखर उद्योग तसेच ऊस विकास, सुरेश राणा यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय अधिकार्‍यांसोबत विस्तृत आणि गहन मासिक समिक्षा बैठक काल लाल बहादुर शास्त्री, ऊस शेतकरी संस्थान, डालीबाग लखनउ च्या सभागृहात झाली. समीक्षा बैठक़ीत सध्याच्या गाळप हंगामातील ऊस थकबाकी, गाळप हंगाम 2020-21 साठी ऊस सर्वेक्षणाची प्रगती, प्रलंबित प्रकरणे, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची प्रलंबित असणारी देयके, थकबाकी देण्याबाबत टाळाटाळ तसेच विभागीय प्रचार प्रसार कार्याअंतर्गत गती आणण्यासह विविध गोष्टींवर समीक्षा करताना विभागीय अधिक़ार्‍यांनी योग्य दिशा निर्देश दिले.

बैठकीत अपर मुख्य सचिव, भूसरेड्डी यांच्याकडून मागील गाळप हंगाम 2018-19 तसेच 2017-18 ची थकबाकी सहित सध्याच्या 2019-20 हंगामातील ऊस थकबाकी भागवण्यासाठी साखर कारखान्यांवर आपला दबाव बनवून, थकबाकी भागवण्यात टाळाटाळ करणार्‍या कारखान्यांविरोधात सक्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. लेखासंबंधित प्रकरणात पेन्शन च्या हेतूने प्रलंबित बाबींबरोबरच सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची देयके भागवण्याचे निर्देश देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here