उत्तर प्रदेश मध्ये ऊस उत्पादकांना मिळाले विसरलेले पैसे

320

लखनऊ : ऊस बिल भागवणे वं ऊस शेतकर्‍यांच्या इतर सर्व समस्यांचे संपूर्ण समाधान करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, योगी आदित्यनाथ यांचा निर्णय तथा ऊस मंत्री, सुरेश राणा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशातील ऊस शेतकर्‍यांच्या नव्या सत्रातील ऊस दराबरोबर पूर्वीच्या हंगामातील ऊसाची राहिलेंली थकबाकीचे सर्व पैसे भागवणे ही सरकारची प्राथमिकता आहे.

ऊस आयुक्त यांनी सांगितले की, प्रदेशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व ऊस क्षेत्रांमध्ये पूर्ण तन्मयतेने ऊस समित्यांमध्ये ऊस शेतकर्‍यांची प्रलंबित थकबाकीचे विवरण तयार करणे तसेच, त्याला त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी हे विशेष अभियान चालवण्यात येत आहे. ज्याच्या अंतर्गत विभागीय अधिकार्‍यांद्वारा सघन अभियान चालवून पश्‍चिमी उत्तर प्रदेशच्या 4 क्षेत्रांमध्ये, जिथे सहारनपूर मध्ये 14,448 शेतकर्‍यांना रु. 31.06 करोड, मेरठ मध्ये 15,529 शेतकर्‍यांना 20.04 रु. करोड, मुरादाबाद मध्ये 9,469 शेतकर्‍यांना 13.59 रु. करोड, बरेलीमध्ये 15,724 शेतकर्‍यांना 11.15 करोड रुपये ऊस थकबाकी भागवण्यात आली आहे. मध्य क्षेत्रातील लखनऊ परिक्षेत्रात 16,735 शेतकर्‍यांना 27.18 करोड रुपये तिथेच पूर्व उत्तर प्रदेशच्या चार परिक्षेत्रांमध्ये आयोध्यामध्ये 5,212 शेतकर्‍यांना 3.84 करोड, देवीपाटण मध्ये 8,352 जणांना 8.69 करोड, गोरखपूर मध्ये 556 जणांना 0.18 करोड, तथा देवरिया परिक्षेत्रात 93 शेतकर्‍यांना 0.12 करोड रुपये दिले गेले आहेत. याप्रकारे आतापर्यंत प्रदेशातील एकूण 86,118 ऊस शेतकर्‍यांना 115.83 करोड रुपये थकबाकी निश्‍चितपणे देण्यात आली आहे.

हे नभागवलेले ऊसाचे पैसे अनेक वर्षांपासून ऊस संस्था / साखर कारखान्यांमध्ये होते आणि ऊस शेतकरी विसरले होते आणि त्यांना हे देखील आठवत नाही की आमच्या किंवा आमच्या कुटुंबातील सदस्यांचे कोणतेही ऊस मूल्य पैसे समिती किंवा साखर कारखाना यांच्याकडे थकीत होते आणि हि थकबाकी ऊस विभाग प्रचार-प्रसार करून त्यांना उपलब्ध करुन देईल. ऊस विभागाच्या सक्रियतेमुळे विसरलेला पैसा मिळाल्यामुळे ऊस समित्यांवरील शेतकऱ्यांचा विश्वास आणखी दृढ झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here