स्टेट बँकेच्या एफडीवरील व्याजदरातएका वर्षात सातव्यांदा कपात

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, एमसीएलआर आधारित कर्जाच्या व्याज दरात ०.५ टक्क्यांची कपात केली आहे. नवे व्याज दर १० नोव्हेंबरपासून लागूहोणार आहेत.

चालू आर्थिक वर्षांत स्टेट बँकेने ‘एमसीएलआर’ आधारित कर्जाच्या  व्याजदरांत सातव्यांदा कपात केली आहे. नव्या निर्णयामुळे एक वर्षापर्यंतच्या कर्जावरील ‘एमसीएलआर’चे व्याज दर ८ टक्क्यांपर्यंतखाली येणार आहेत. अर्थव्यवस्थेतील तरलता लक्षात घेऊन बँकेने मुदत ठेवींवरील व्याज दरांतही बदल केले आहेत. एक ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.१५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. तर, मोठ्या रकमेच्या ठेवींवर ३० ते ७५ बेसिसपॉइंटची कपात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here