आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या कोविड १९ गाईडलाइन्स, १४ फेब्रुवारीपासून भारतात येण्यास आरटीपीसीआरची गरज नाही

केंद्र सरकारने १४ फेब्रुवारीपासून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोविड १९ गाईडलाइन्सबाबत सुधारित निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात येणाऱ्या प्रवाशांना १४ फेब्रुवारीपासून सात दिवसांच्या अनिवार्य होम क्वारंटाइन अथवा आरटीपीसीआर चाचणीची गरज भासणार नाही.

सरकारने दिलेल्या नवीन निर्देशानुसार भारतात येणाऱ्या प्रवाशांना आठव्या दिवसानंतर अनिवार्य आरटीपीसीआर चाचणीची गरज भासणार नाही. सरकारने सात दिवसांच्या होम क्वारंटाइनपासूनही सुट दिली आहे. आरटीपीसीआरच्या ७२ तासांच्या अहवालाची अटही काढून टाकली आहे. ज्या प्रवाशांना एअर सुविधा पोर्टलवर सेल्फ डिक्लरेशन फॉर्म भरुन माहिती दिली आहे आणि कोविड १९ लसीकरणाचे प्रमाणपत्र अथवा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सादर केला असेल अशा प्रवाशांना एअरलाइन्स कंपन्या बोर्डिंगची परवानगी देतील. हा पर्याय ८२ देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी आहे. त्यांच्या लसीकरणास भारत सरकारने परस्पर कार्यक्रमांतर्गत मान्यता दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी ट्वीट केले आहे की, सर्व देशांतून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे २ टक्के रँडम सॅम्पलिंग केले जाईल. ते आपला नमुना देतील. त्यानंतर त्यांना विमानतळाबाहेर जाण्यास परवानगी दिली जाईल. यापूर्वी अशा प्रवाशांना आंतरराष्ट्रीय रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक होता.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट केले आहे की, आरोग्य मंत्र्यालयाने १४ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय निर्देशांमध्ये सुधारणा केली आहे. त्याचे पालन करून भारताला कोविड विरोधाती लढाईत सर्वांनी सक्षम बनवावे.
प्रवाशांना आरटीपीसीआरची ७२ तासांची चाचणी अनिवार्य असल्याची अट शिथिल करण्यात आली आहे. आता ते लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here