पाकिस्तानकडून २ लाख टन साखर खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय निविदा

हॅम्बर्ग : ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानने (टीसीपी) २ लाख टन पांढरी साखर खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय निविदा जारी केली आहे. हा निविदेसाठी प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम मुदत २४ ऑगस्टअखेर आहे.

टीसीपीने स्थानिक पुरवठ्यामध्ये सुधारणा आणि किंमतीमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी साखर खरेदीच्या निविदा जारी करण्याचा सपाटा लावला आहे. पाकिस्तान सरकारने २०२० मध्ये साखरेचा तुटवडा भरून काढण्यासाठी आयातीस मंजुरी दिली होती. उत्पादनाचा स्तर खालावल्याने स्थिती चिंताजनक होती. पाकिस्तान सरकारने गतीने शिपमेंट मागवली आहे. जनतेला लवकरात लवकर दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी २५,००० ते ३०,००० टनाच्या शिपमेंटचा करार केल्यानंतर १५ दिवसांत पुरवठ्याचे निकष आहेत. उर्वरीत टप्प्यातील साखर १० नोव्हेंबरपर्यंत पाठविणे अपेक्षित आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here