उत्तर प्रदेशमध्ये साखर उद्योगात विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी

लखनौ : उत्तर प्रदेशातील शैक्षणिक कॉलेजीस आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता साखर उद्योग आणि ऊस विकास विभाग इंटर्नशीपची संधी देणार आहे. रोजगारपूरक शिक्षण देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या या योजनेस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सेमिस्टर परीक्षांमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रम अथवा या विषयाशी संबंधिक शिक्षण घेत आहेत आणि ज्यांनी गेल्या सेमिस्टरमध्ये ५५ टक्के गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी २१ ते ६० दिवसांचा इंटर्नशीप कार्यक्रम असेल. ऊस विभागाशी संबंधीत ऊस संशोधन परिषद, सहकारी ऊस समिती संघ लिमिटेड, राज्य साखर संघ आणि सहकारी साखर कारखाना संघाच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले आहे.

अप्पर मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांनी सांगितले की, इच्छूक विद्यार्थी ऊस विकास आणि साखर उद्योगाच्या वेबसाईटवर शैक्षणिक वर्षात एकदाच अर्ज करू शकतात. हे प्रशिक्षण त्यांना भविष्यात रोजगार मिळविण्यासाठी उपयुक्त ठरेल. प्रशिक्षणासाठी ९५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. प्रशिक्षण घेताना विद्यार्थ्यांना सरकारी कामातील गोपनीयतेचे घोषणापत्र द्यावे लागेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here