पानीपत : IOC चा इथेनॉल प्लांट लवकरच १०० % क्षमतेपर्यंत पोहोचणार

पानीपत : सुमारे ९०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा (IOC) २G इथेनॉल प्लांट आगामी काही महिन्यांत ३० टक्क्यांपासून १०० टक्के क्षमतेच्या वापरापर्यंत पोहोचेल, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत माधव वैद्य यांनी सांगितले. ऑगस्ट २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.

याबाबत द हिंदू माध्यम समुहाच्या पत्रकारांशी बोलताना, वैद्य म्हणाले की, बायोइथेनॉल प्लांटसाठी फीडस्टॉक म्हणून भाताचा भुसा (पेंढा) केवळ ४५ दिवस वापरण्यासाठीच उपलब्ध आहे. हा भुस्सा वर्षभरासाठी साठवला जाणे गरजेचे आहे. या प्लांटला दरवर्षी १,५०,००० टन फीडस्टॉकची आवश्यकता असेल. ते म्हणाले की, फीडस्टॉकची साठवणूक आता सुरू झाली आहे. प्लांट लवकरच पूर्ण उत्पादन क्षमतेपर्यंत पोहोचेल. वैद्य म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये आयओसीचे मिश्रण १२.५ टक्क्यांपर्यंत होते. या मिश्रणाचे प्रमाण पुढील वर्षीपर्यंत १५ टक्के केले जाईल. नंतर हळूहळू ते २०२५ पर्यंत २० टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

याशिवाय, २ जी इथेनॉलचा एक भाग SAF (टिकाऊ विमान ईंधन) च्या उत्पादनासाठी जाईल. लँजाटेकची सहायक कंपनी लँजाजेटसोबतच्या एक संयुक्त उपक्रमांतर्गत पानीपत रिफायनरीजवळ याचे उत्पादन सुरू आहे. यामध्ये आयओसीची हिस्सेदारी आहे. आंतरराष्ट्रीय नागरि उड्डाण संघटनेच्या कार्बन ऑफसेटिंग अँड रिडक्शन स्कीम ऑफ इंटरनॅशनल एव्हिएशन (CORSIA) ने म्हटले आहे की, एअरलाइन्स २ टक्के SAF मिश्रणासह उड्डाण करेल. आयओसी या निर्णयाचे पालन करत इंधन पुरवठा करेल असे वैद्य म्हणाले.

ग्रीन हायड्रोजन

ग्रीन हायड्रोजनबद्दल, ते म्हणाले की एलअँडटी आणि अक्षय ऊर्जा कंपनी, रीन्यू एनर्जीसोबत एक संयुक्त उपक्रम तयार करण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये आयओसी आपल्या पानीपत रिफायनरीजवळ १०,००० टन प्रती वर्ष ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता उभारण्यसाठी बोली मागवेल असे वैद्य म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here