IOCL कडून तामिळनाडूमध्ये २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल सादर

चेन्नई : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने अलिकडेच राज्यातील २६ इंधन आउटलेट्सवर २० टक्के इथेनॉल (E२०) मिश्रीत फ्युएल लाँच केले आहे अशी घोषणा कंपनीचे राज्य प्रमुख आणि कार्यकारी संचालक व्ही. सी. अशोकन यांनी गुरुवारी केली. मार्च २०२४ पर्यंत आणखी ६६ आउटलेटवर हे इंधन उपलब्ध होईल असे ते म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कंपनीने आधीच राज्यात १० टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोलचे उद्दिष्ट गाठले आहे. आणि २०२५ पूर्वी २० टक्के मिश्रणाच्या दिशेने आम्ही काम करीत आहोत. ते म्हणाले की, यातून कच्च्या तेलाच्या आयातवरील खर्च कमी करण्यास मदत होईल. आम्ही मिश्रण केल्या जाणाऱ्या इथेनॉलचे प्रमाण वाढवू शकते. मात्र, त्यासाठी वाहने सुसंगत असली पाहिजेत. यासाठी वाहन उत्पादकांशी आम्ही चर्चा करीत आहोत.

अशोकन यांनी सांगितले की, IOCL केरळ आणि तामिळनाडूनमध्ये हरित हायड्रोजन उत्पादन करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट प्लांट स्थापन करण्याचा विचार करीत आहोत. उत्पादनाची मागणी, जमीन आणि विजेची उपलब्धता या सुविधांच्या आधारावर प्लांट्सची संख्या निश्चित केली जाईल. कंपनीने आपल्या सांकरी टर्मिनलवर बायो डिझेलसाठी काम सुरू केले आहे. अशा प्रकारची सुविधा लवकरच अशनूर आणि काईंबतूरमध्ये उभारली जाईल. आणि इतर ठिकाणीही कालबद्ध पद्धतीने मिश्रण सुविधा उपलब्ध होईल.

ते म्हणाले की, जेथे एकिकृत तरल नैसर्गिक गॅसचा प्रश्न आहे, राज्यात सहा डिस्पेंसिंग स्टेशन सुरू केले जातील. यामध्ये एक श्रीपेरुम्बुदुरमध्ये एक पायलट प्रोजेक्ट असेल. इतर प्रोजेक्ट पोन्नेरी, ओथा कदाई, नमक्कल, कोईंबतूक आणि कोनेरीपल्लीमध्ये तयार केली जातील. हे इंधन मोठ्या वाहनांसाठी असेल. कंपनी ११३ केंद्रांच्या माध्यमातून कॉम्प्रेस्ड नैसर्गिक वायूची विक्री करते आणि आपल्या भागिदारांच्या माध्यमातून १२२ आऊटलेटसला आणखी ५० आऊटलेट्स जोडण्याचा प्रयत्न आहे. ते म्हणाले की, इंडियन ऑईल राज्यात ३०० इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन स्थापन करण्याची योजना तयार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here